Let us grow your website traffic.

images_not_found

टाटा साहेब गेले..!

प्रत्येक युवकाने आपली कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी , समाजातील मान-सन्मान कमविण्यासाठी पैसा कमवावा हा सर्वसामान्य नियम आहे . तत्कालीन हर्षद मेहता सारख्या वेबसिरीज आल्या नंतर , 'इन्फ्लुएन्स' होऊन त्याच्या रिंगटोन लावणारे अथवा त्या वेबसिरीज मधले डायलॉग वापरून रील बनवणारे युवक पाहिले की , रतन टाटा एका देव्हाऱ्यातील संथ तेवणाऱ्या नंदादीपा प्रमाणे भासतात..!

लँड रोव्हर , जॅग्वार सारख्या मल्टिनॅशनल कंपन्या टाटा विकत घेत होते . तेव्हा त्या प्रत्येक भारतीयाला आपण विकत घेतोय अशी फीलिंग येत होती हे कुणीही नाकारू शकत नाही . अंबानी - अदानी किंवा देशातील इतर उद्योगपतींकडे खूप पैसा असेल पण ; सर्वसामान्य व्यक्तीला त्यांच्या बद्दल आपुलकी वाटत नाही जी , टाटा समूह आणि रतन टाटा यांच्याबद्दल वाटते.

टाटा उद्योग समूहाने , त्यांच्या कामगारांवर केलेले पुत्रवत प्रेम , टाटा समूह आजवर अव्याहत चालवत असलेले सामाजिक संस्था , कोरोना काळात सरकारला केलेली मदत ही कसे कोण विसरू शकेल ?

रतन टाटा साहेब , तुम्ही गेले असाल तरी , तुमचा विचार आमच्या सारख्या अनेक व्यक्तींच्या जीवनात नंदादीपाप्रमाणे अखंड तेवत राहील.

भारत देश 'उभा' करण्यात 'टाटांचे' योगदान 'अजमरमर' आहे. भावपूर्ण श्रद्धांजली

.....✍️ निखिल सुभाष थोरवे