२०१८-२०१९ मध्ये जियो क्रांती घडून आली आणि खऱ्या अर्थाने डिजिटल युगाचा भारतामध्ये प्रारंभ झाला. सुरुवातीला केवळ ब्राउजिंग पुरता मर्यादित असणारा इंटरनेटचा वापर अधिक विस्तृत झाला. सोशल मीडिया ज्याला पूर्वी केवळ मनोरंजनाचे माध्यम गणले जात होते त्याने व्यवसाय वृद्धिमध्ये महत्वाची भूमिका पार पाडण्यास सुरुवात केली.
आज जगातील सर्वोत्तम ब्रँड सोशल मीडिया वर उपस्थित आहेत. मोबाईल हा ग्राहकाच्या अंत्यत जवळ असणारे इलेक्ट्रॉनिक गॅझेट .. !!
माहितीची सुलभ देवाण घेवाण, जाहिराती आणि आपल्या प्रॉडक्टची सर्वात लवकर आणि खात्रीपूर्वक माहिती पोहोचविण्यासाठी मोबाईल आणि त्या अनुषंगाने सोशल मीडिया हा टाळता न येण्यासारखा घटक राहिला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे ग्राहकाच्या मनात असणारे प्रॉडक्ट्स सातत्याने दाखवत राहून, त्यांना प्रॉडक्टकडे आकर्षित करण्याचा राजमार्ग सापडला आहे.
बँकिंग सेक्टर, UPI या माध्यमातून सुरक्षित आणि खात्रीशीर व्यवहार पूर्ण करणे अधिक सुलभ झाले आहे. डिजिटल करन्सी मुळे कागद आणि पर्यावरण संरक्षण याची एकप्रकारे हमीच येणाऱ्या पिढीस मिळत आहे.
आपण देखील आपल्या व्यवसायाचे डिजिटल ब्रँडिंग उत्तमप्रकारे करू शकता. आपल्याला अपेक्षित असणारा टार्गेट ऑडियन्स यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार आपले प्रॉडक्ट्स लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकता.
कोणत्याही प्रदेशात आपल्या प्रॉडक्ट्सला चांगली मागणी हे किंवा कोणता वयोगट आपला प्रॉडक्ट लाईक करतोय हे आपल्याला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्पष्टपणे कळू शकते आणि आपल्या व्यवसाय वाढीसाठी युव्यरचना आखता येऊ शकते.
.......✍️ दीपक वानखेडकर